वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर झाकण उघडं ठेवता का?

वॉशिंग मशीनच्या सहाय्याने तुम्ही काही वेळात कपडे धुवू शकता. पण जर तुम्ही वॉशिंग मशीनची योग्य काळजी घेतली नाही तर मात्र तुमचे कपडे खराब होऊ शकतात.

Jul 28,2023

वॉशिंग मशीनचीही स्वच्छता करणं गरजेचं

वॉशिंग मशीन जास्तीत जास्त काळ चांगली टिकावी यासाठी तुम्ही तिची योग्य काळजी ठेवणं गरजेचं आहे. अनेकांना इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणे वॉशिंग मशीनचीही स्वच्छता करायची असते याची कल्पना नसते.

तुम्ही लगेच वॉशिंग मशीन बंद करता का?

अनेकदा आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून झाले की ती लगेच बंद करुन त्यावर कव्हर टाकून ठेवून देतो. तुम्हालाही अशी सवय असेल तर मग लक्ष द्या.

पण कारण काय?

याचं कारण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर त्याचं झाकण थोड्या वेळासाठी उघडं ठेवा. असं का करायचं असा विचार तुमच्या मनात असेल तर मग जाणून घ्या.

बॅक्टेरिया वाढत नाही

असं केल्याने त्यात हवा जाते आणि बुरशी लागत नाही. तसेच आर्द्रतेमुळे त्यात कोणतेही बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत.

ओलाव्यामुळे वास

याशिवाय अनेक वेळा असे घडते की एकदा आपण कपडे धुतल्यानंतर आणि वॉशिंग मशीन पूर्णपणे पॅक केल्यावर ओलाव्यामुळे वास येऊ लागतो. मशीन बंद असल्याने त्याला बाहेर पडण्यास जागा नसते.

40-45 मिनिटे झाकण उघडं ठेवा

त्यामुळे कपडे धुतल्यानंतर 40-45 मिनिटे झाकण उघडं ठेवलं तर पुढच्या वेळी त्यात कपडे धुण्यासाठी ठेवले तर त्यांना वास येणार नाही.

वॉशिंग मशिन स्वच्छ ठेवा

याशिवाय वॉशिंग मशिनची नियमित साफसफाईही करावी. यासाठी स्वयंपाकघरात ठेवलेला व्हिनेगर वापरू शकता.

पांढरा व्हिनेगर वापरा

मशीनला हॉट सायकलवर सेट करा आणि त्यात पांढरा व्हिनेगर टाका. यामुळे मशीन साफ ​​होईल, आणि त्याचा वासही येणार नाही.

VIEW ALL

Read Next Story