डाएटच्या नादात केस गळायला लागलेत, तुम्ही 'या' चुका तर करत नाहीयेत ना?

वजन कमी करण्यासाठी किंवा फिट आणि हेल्दी राहण्यासाठी डायटिंग करतात. मात्र, अनकदा डायटिंग करताना झालेल्या चुकांचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

Mansi kshirsagar
Jul 28,2023


वजन कमी करण्याच्या या प्रक्रियेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर त्याचे साइड इफेक्टदेखील जाणून घेतले पाहिजेत. केस गळणे, हे देखील त्याचेच एक लक्षण असू शकते.


तुम्ही वेट लॉस डाएट करत असताना तुमचे केस कमजोर आणि पातळ झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्ही डाएट करताना काही चुका करत आहात.


वेट लॉस डाएटमध्ये कार्ब्स आणि कॅलरीची मात्रा कमी असलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र हेच तुमच्या केसांसाठी नुकसानदायक ठरु शकते


केस मजबूत ठेवण्यासाठी शरीराला प्रोटीन आणि कॅलरीची गरज असते. या गोष्टींचा पुरवठा शरीराला न झाल्यास केस मुळांपासून कमजोर होतात आणि गळायला लागतात.


वजन कमी करण्यासाठी आपण अनेक पदार्थ खाण्याचे टाळतो. त्यामुळं इमोशनल आणि फिजिकल स्ट्रेस वाढतो. त्यामुळं हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळेच केसांच्या मुळांवर त्याचा इफेक्ट होतो.


वजन कमी करत असताना हेल्दी डाएट करताना हेअर फॉल जास्त होत असेल तर क्रॅश डाएटपासून बचाव करा


आरोग्य तंदुरस्त राहण्यासाठी शरीराला सर्व प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. असं न झाल्यास शरीरात अनेक गोष्टींची कमतरता भासते. त्यामुळंच कधी स्ट्रीक्ट डाएट करु नका

VIEW ALL

Read Next Story