प्रत्येक रंगाला विशेष महत्त्व आहे. हिरवा रंग - सकारात्मक तर लाल रंग हा नकारात्मक असतो.
रोज नजरेत दिसणारी स्कूल बस ही पिवळ्या रंगाची का असते याचा विचार केलाय का कधी? यामागील कारण जाणून घ्या.
पिवळा रंग हा चमकदार असल्याने तो दूरुनही दिसतो.
खराब हवामान किंवा कमी प्रकाशातही स्कूल बस इतर चालकांना ओळखण्यास मदत मिळते.
पिवळा रंग हा धोक्याचा रंग मानला जातो. त्यामुळे रस्त्यावरील इतर गाडी चालक सावध होतात.
बाल मानसशास्त्रानुसार पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाशी संबंधित आहे. त्यामुळे स्कूल बस पाहून मुलांना आनंद मिळतो.
त्यामुळे अनेक देशांमध्ये स्कूल बसचा रंग हा पिवळाच ठेवण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्कूल बसचा रंग पिवळा असावा तर या बसच्या मध्यभागी 150 मिमी रुंदीचा हिरव्या रंगाचा पट्टावर स्कूल बस असं लिहिलं असावं.
अमेरिकेत 1930 झालेल्या एका अभ्यासात असं सिद्ध झालं की, पिवळ्या रंग इतर रंगांपेक्षा जास्त आकर्षण असतं.