मूग डाळमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन, बी१, फास्फोरस, आर्यन, कॉपर, जिंक, व्हिटॅमिन बी 2,3,5,6 आणि सेलेनियम सारखे पोषकत्त्व असतात.
मूग डाळ वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण काहीवेळेला मेडिकल स्थितीमध्ये मूग डाळीचे सेवन करु नये.
जर कुणाला हाय युरिक ऍसिडची समस्या असेल तर मूग डाळीचे सेवन करणे टाळले पाहिजेत. यामुळे शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते.
ज्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असते त्या व्यक्तीने मूग डाळीचे सेवन करू नये. कारण यामुळे किडनी स्टोनचा त्रास वाढेल.
फायबरचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणून मूगकडे पाहिलं जातं. पण यामुळे पचनक्रियेला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तीला पचनाची किंवा गॅसची समस्या असेल त्या व्यक्तीने मूग खाणे टाळावे.
अनेक लोकांना मूग खावून शरीराला खाज येते. ज्या व्यक्तीची त्वचा अतिशय सेंसेटिव असेल त्या व्यक्तीने मूग खाणे टाळा.