रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतात General डबे?
तुम्हाला माहितीये का, लाखोंच्या संख्येनं नागरिक रेल्वेनं प्रवास करत असून, त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त रेल्वेचीच आहे.
किंबहुना रेल्वे विभागाकडून ही जबाबदारी पार पाडलीही जाते. अशा या रेल्वेच्या General Coach विषयी तुम्हाला कधी काही प्रश्न पडले आहेत का?
रेल्वे कोणतीही असो तिच्या सुरुवातीला किंवा शेवटीच हे जनरल डबे का जोडण्यात येतात? कधी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे?
जनरल कोच रेल्वेच्या सुरुवातीला किंवा शेवटी जोडण्याचं कारण म्हणजे प्रवाशांना होणारी गैरसोय. हीच गैरसोय टाळण्यासाठी हे डबे सुरुवातीला आणि शेवटी जोडलेले असतात.
जनरल डबा रेल्वेच्या मध्यभागी असल्यास त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.
इतकंच नव्हे, तर आसनावरूनही या प्रवाशांमध्ये अनेकदा शाब्दिक बाचाबाचीसुद्धा होते.
जनरल डबे सुरुवातील आणि शेवटी लावल्यामुळं त्यांच्या सुरक्षिततेची हमीही देणं रेल्वे विभागाला सहज शक्य होतं.
सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जनरल डबे सुरुवातीला आणि शेवटी जोडल्यास त्यामुळं प्रवासादरम्यान रेल्वेचं संतुलन राखणं सहज शक्य होतं.
वरील सर्वच कारणांमुळं रेल्वेचे जनरल कोच कायमच सुरुवातीला आणि शेवटी असतात. आता ही माहिती तुम्हाला तर कळली, इतरांना कधी सांगताय?