भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जातोय.
अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने आपल्या फिरकिने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाचवलं.
रविंद्र जडेजाने दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांना त्याने बाद केलं
ट्रॅव्हिस हेडला बाद करताच रवींद्र जडेजाने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला
जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डाव्या हाथाचा भारतीय स्पीनर बनला आहे.
याआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंह बेदी पहिल्या क्रमांकवर होते.
डाव्या हाताने स्पीन गोलंदाजी करणाऱ्या बिशन सिंह बेदी यांनी तब्बल 266 विकेट घेतल्या होत्या.
श्रीलंकेचा रंगना हेराथ कसोटी क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट घेणारा डावखुला गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 433 विकेट आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची पहिली इनिंग 296 धावांवर आटोपल होती. अजिंक्य राहाणेने एकट्याने खिंड लढवली होती.
कसोटी सामना जिंकण्यासाठी आता भारतीय फलंदाजांना दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानावर तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे.