नारायण मूर्तींनी दिलं समर्पक उत्तर

भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती हे स्वतः शौचालय स्वच्छ करतात. हे जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल. पण एवढा पैसा असलेला माणूस, जो हजारो नोकर ठेवू शकतो, तो असे का करेल?

एका मुलाखतीमध्ये नारायण मूर्ती यांना विचारण्यात आले की ते त्यांच्या मुलांना हे सगळं कसे समजावून सांगता असा प्रश्न विचारला होता. यावर नारायण मूर्ती यांनी उत्तर देताना महत्त्वाचं विधान केलं.

मुले नेहमीच उत्सुक असतात. माझ्या मुलांना मी सांगतो की इतरांबाबत आदर व्यक्त करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आपल्या समाजामध्ये जे लोक स्वच्छतेचे काम करतात त्यांच्याकडे खालच्या दर्जाचे म्हणून पाहिलं जातं.

त्यामुळे मी माझ्या मुलांना सांगत असतो की कोणीही आपल्यापेक्षा कमी नाही. कारण आपल्या समाजात असे मानले जाते की आपले शौचालय स्वच्छ करणारे लोक आपल्यापेक्षा कमी किंवा लहान आहेत.

मी माझ्या मुलांना समजावून सांगतो की आपल्यापेक्षा कोणीही लहान नाही. देवाने आपल्याला फार चांगल्या स्थितीत ठेवलं आहे. तो आपला हक्क म्हणून आपण स्वीकारू शकत नाही. तसेच याचा अभिमान बाळगू शकत नाही.

आपण दुसऱ्यांना कमी लेखू नये. आपण फक्त चांगल्या स्थितीत जन्मलो आहोत. समाजातील इतर लोकांसोबत आपण न्यायपणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी मुलांना सांगत असतो, असे नारायण मूर्ती म्हणाले.

मूर्ती यांना राजकारणात यायचे आहे का असे विचारले असता त्यांनी नकार दिला. मला वाटते की मी यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी खूप वृद्ध आहे. मी आता 78 वर्षांचा आहे, असे नारायण मूर्ती म्हणाले.

VIEW ALL

Read Next Story