भारतातील 'या' गावात परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी का येतात?

भारतातील या प्रदेशातील एक गाव आहे जे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. कारण इथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात, असं म्हटलं जातं. कुठलं आहे गाव आणि काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात.

अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार लडाखची राजधानी लेहच्या नैऋत्येला असलेल्या बियामा, गारकोन, दारचिक, दाह आणि हानू ही गाव आहेत. या गावांमध्ये ब्रोक्पा समुदाय राहतो. हे जगातील शेवटचे शुद्ध आर्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शुद्ध आर्य म्हणजे काय? तर नाझी युगातील वांशिक सिद्धांतकारांनी शुद्ध जातींना मास्टर रेस असं संबोधलं आहे. या आधारावर जर्मनीत ज्यूंची हत्या करण्यात आली होती.

मास्टर वंशाच्या लोकांची कथिक वैशिष्ट्ये म्हणजे ते उंच, गोरे, निळे डोळे आणि मजबूत जबडे दिसणारे भक्कम व्यक्तिमत्व असतात. ते खूप हुशार असतात असं म्हणतात.

2017 मध्ये भारत सरकारने ITBP ने ब्रोक्पा समुदायातील काही लोकांचे आणि त्यांच्या गावाचे छायाचित्र शेअर केले होते.

इंटरनेटच्या जमान्यात ब्रोक्पा आणि लडाखच्या खेड्यापाड्यात आलेल्या जर्मन महिलांच्या स्टोरी प्रकाशझोत्यात आल्या.

2007 मध्ये चित्रपट निर्माते संजीव सिवन यांचा 30 मिनिटांची डॉक्युमेंटरी अचतुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी प्रदर्शित झाला होता. यात एका जर्मन महिलेने कॅमेऱ्यात कबूल केलं होतं की, शुद्ध आर्यन स्पर्म्सच्या शोधात ती लडाखमध्ये आली होती.

डॉक्युमेंटरी ती महिला असंही म्हणाली की, मुलाला जन्म देण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास करणारी आर्यन ही पहिली जर्मन महिला नाही किंवा शेवटचीही नाही.

ब्रोक्पा दाव्यांसाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्याची कोणतीही डीएनए चाचणीदेखील झालेली नाही. केवळ लडाखी संस्कृतीपेक्षा ते वेगळे असल्यामुळे त्यांना शुद्ध आर्य मानलं जाऊ लागलं. ते केवळ त्यांच्या शारीरिक स्वरुपाच्या आधारे शुद्ध आर्य असल्याचा दावा करतात.

VIEW ALL

Read Next Story