बरेच लोक विजेचे स्विच आणि स्विच बोर्ड साफ करण्याकडे लक्ष देत नाहीत.तुमच्या घरात लावलेला स्विच बोर्ड घाण झाला असेल तर आम्ही तुम्हाला कसा स्वच्छ करायचा याबाबत सांगणार आहोत. यामुळे स्विच नव्यासारखा चकचकेल.

काळे झालेले स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वीजपुरवठा बंद करा. अन्यथा तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

घरातील इतर सदस्यांनाही वीजपुरवठा बंद करण्याबाबत माहिती द्या, जेणेकरून साफसफाई करताना चुकूनही वीज चालू केली जाणार नाही.

तुम्ही टूथपेस्टचा वापर स्विच बोर्ड साफ करण्यासाठी देखील करू शकता. टूथपेस्ट स्विच बोर्डवरील डाग आणि घाण पूर्णपणे साफ करू शकते.

इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड साफ करण्यासाठी, प्रथम एका भांड्यात 3-4 चमचे टूथपेस्ट घ्या आणि त्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाकून चांगले मिसळा.

यानंतर, त्यात पाण्याचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करा आणि स्विच बोर्डवर लावा.

दहा मिनिटांनंतर, टूथब्रश किंवा क्लिनिंग ब्रशने स्विच बोर्ड घासून घ्या आणि नंतर कापडाने पुसून टाका.

यानंतर इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड अगदी नव्यासारखा दिसेल.

VIEW ALL

Read Next Story