कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं?

Jun 03,2024

भारतामध्ये एवढं सोनं

भारतामध्ये एवढं सोनं होतं की इथून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जायचे. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या देशात सर्वाधिक सोने आहे.

आरबीआय

जगातील विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँका वेगाने सोने खरेदी करत आहेत. गेल्या चार महिन्यांत आरबीआयने स्वतः २४ टन सोन्याची खरेदी केली आहे.

भारत कोणत्या क्रमांकावर

त्यामुळे भारताचा सोन्याचा साठा ८००टनच्या पुढे गेला आहे. जागतिक सुवर्ण परिषदेनुसार २०२४ मध्ये कोणत्या देशात सर्वाधिक सोने आहे आणि भारत त्यात कोणत्या क्रमांकावर आहे हे जाणून घेऊया.

अमेरिका

अमेरिकेत सर्वाधिक ८,१३३.४६ टन सोन्याचा साठा आहे. त्याची किंमत सुमारे ५७९,०५०.१५ दशलक्ष डॉलर्स आहे. यानंतर जर्मनी ३,३५२.६५ टनांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

इटली

सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत इटली तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांच्याकडे २,४५१.८४ टन सोने आहे.

फ्रान्स

या बाबतीत फ्रान्स २,६३४.८८ टन सोन्यासह चौथ्या स्थानावर आहे.

रशिया

रशियाकडे २,३३२.७४ टन सोने असून ते पाचव्या स्थानावर आहे.

चीन

भारताचा शेजारी देश चीन सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे आणि ड्रॅगनकडे २,२६२.४५ टन आहे.

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडकडे १,०४० टन सोन्याचा साठा आहे. यानंतर जपान ८४५.९७ टनांसह आठव्या स्थानावर आहे.

भारत

सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारत नवव्या स्थानावर असून RBI कडे ८२२.०९ टन सोने आहे तर नेदरलँडमध्ये ६१२ टन सोने आहे.

VIEW ALL

Read Next Story