मुंबई महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी आहे. याबरोबरच मायानगरी म्हणूनही मुंबईची ओळख आहे.
देशातील कानाकोपऱ्यातून अनेक जण स्वप्न पू्र्ण करण्यासाठी मुंबईत येतात.
मुंबईला स्वप्ननगरी असंही म्हणतात. असं म्हणतात मुंबई कोणालाच उपाशी झोपू देत नाही.
पण तुम्हाला माहितीये का देशात असंही एक शहर आहे ज्याला भारताची मिनी मुंबई म्हणून ओळखलं जातं.
मध्य प्रदेशातील इंदौर या शहराला मिनी मुंबई म्हणून ओळखलं जात. तसं तर इंदौर या शहराची आपली वेगळी ओळख आहे.
मुंबईत जसे अनेक उद्यागधंदे व व्यवसाय आहेत त्याचप्रमाणे इंदौर हे लघु उद्योगांसाठी ओळखले जाते.
मुंबईप्रमाणेच इंदौरमध्ये अनेक लघु उद्योग आहेत. निरनिराळ्या प्रकारचे उत्पादन येथे पाहायला मिळतात.
म्हणूनच इंदौर या शहराला मिनी मुंबई म्हटलं जातं.