Diabetes ने त्रस्त असाल तर बदला जीवनशैली, काय करावे काय टाळावे? जाणून घ्या

जीवनशैलीत कोणते बदल

तुम्ही जर मधुमेहाने त्रस्त असाल जीवनशैलीत कोणते बदल करायला हवे जाणून घेऊया.

या वयोगटातील रुग्ण त्रस्त

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, 20 ते 70 वर्ष वयोगटातील साधारणत: 8.7 टक्के लोक मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत.

व्यायाम

मधुमेहाचा आजार हा लठ्ठपणा किंवा जास्त वजन यासारख्या परिस्थितीमुळे वाढणारा आजार आहे.यासाठी व्यायामाला आपल्या आरोग्याचा भाग बनवा.

ब्रेक घ्या

एकाच जागी जास्त वेळ बसल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जास्त वेळ बसल्याने अनेक आजारांचा धोका उद्भवतो. त्यासाठी एकाच ठिकाणी बसणे टाळा.

आहार

रक्तातील साखरेची पातळी वाढत असेल तर फायबरने समृद्ध असलेले पदार्थ निवडा. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहिल.

पाणी प्या

पाण्याच्या कमतरतेमुळे पाचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यासाठी किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या.

पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरेतमुळे आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढू शकतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे रोज 7 ते 8 तासांची झोप घ्या.

VIEW ALL

Read Next Story