कर्नाटकातल्या 'मंसोलस्सा'मधून पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. पेशव्यांच्या काळातही पुराणपोळ्या तयार केल्या जायच्या.
काही लोकप्रिय ग्रंथांतूनही पुरणपोळीचा उल्लेख करण्यात आला आहे.
कारण आपण जी हरभरा डाळ पुरणपोळीत वापरतो ती कर्नाटकात लोकप्रिय आहे.
पुरणपोळी कर्नाटकातून आली आहे असाही काही ठिकाणी उल्लेख सापडतो.
गरमगरम पुरणपोळी, त्यावर दूध आणि तूप जीभेला लागल्याशिवाय आपलं मनं तृप्त होत नाही.
आपल्यासाठी पुरणपोळी बनवणं हेच एक सोहळ्याप्रमाणे असते.
पुरणपोळी ही आपल्या सर्वांनाच प्रिय आहे तेव्हा आपण कुठल्याही सणासुदीला पुरणपोळीचा बेत हमखास करतो.