भारताचा पराभव झाला तर एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यासाठी सहज हे शब्द वापरले जात आहेत.
मराठीत पनौती हा शब्द पनवती असा वापरला जातो.
पनवती हा शब्द एखाद्या व्यक्तीला तो किती कमी नशीबवान आहे हे दाखवून हिणवण्यासाठी वापरला जातो.
हिंदीत बोली भाषेमध्ये एखाद्या व्यक्तीला अशुभ किंवा कमी नशीबवान असे संबोधताना पनौती हा शब्द वापरला जातो.
अशुभ असा अर्थ न लावता बऱ्याचदा केवळ थट्टा-मस्करी किंवा हिणवण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो.
काही लोक या शब्दाचा अर्थ ज्योतीष शास्त्राशी सुद्धा जोडून पाहतात.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की नाशिकमध्ये श्री पनवती हरन हमुमान मंदिर आहे.