अंतराळातील दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी लॅंडर आणि रोव्हरची मदत घेतली जाते.
ज्याप्रमाणे चांद्रयान 3 साठी विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर पाठविण्यात आले.
लॅंडर आणि रोव्हर रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात पाठवले जातात.
लॅंडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरुन सतत माहिती पाठवत आहेत.
पण मिशन पूर्ण झाल्यावर लॅंडर, रोव्हरचे काय होते? असा प्रश्न विचारला जातो.
ते पृथ्वीवर परत येतात की अंतराळातच कुठेतरी हरवून जातात?
लॅंडर आणि रोव्हर मिशननंतर तिथेच राहतात. केवळ त्यांचा संपर्क तुटतो.
चांद्रयान मिशन पूर्ण झाल्यानंतर विक्रम आणि प्रज्ञान तिथेच असतील.