लॅंडरवर नक्की कशाची फॉईल असते?

अंतराळयानावरील फॉइल सारखी दिसणारी ही गोष्ट मल्टी-लेयर इन्सुलेशन असते. हे मल्टी लेयर इन्सुलेशन अनेक रिफ्लेक्टिव्ह फिल्म्सपासून बनलेले असते. जे खूप हलके असतात आणि त्यांची जाडी बदलत असते.

मल्टी-लेयर इन्सुलेशन कसे बनते?

मल्टी-लेयर इन्सुलेशन हे पॉलिमाइड किंवा पॉलिस्टर (एक प्रकारचे प्लास्टिक) चे बनलेले असतात. त्याच्यावर अॅल्युमिनियमचा लेप देखील असतो.

MLI मध्ये काय वापरायचे कसे ठरते?

अंतराळ यानातल्या उपकरणांचे किती सूर्यप्रकाश पडायला हवा किंवा ते यान कोणत्या कक्षेत फिरणार आहे यावरुन मल्टी-लेयर इन्सुलेशनमध्ये प्लॅस्टिक, अॅल्युमिनियम किंवा इतर काही वापरायचे ठरवले जाते.

विक्रम लँडरवरचे मल्टी-लेयर इन्सुलेशन कसे आहे?

लँडरवरच्या शीटवर बहुतेक वेळा अॅल्युमिनियम लेपित पॉलिमाइडचा एक थर असतो. त्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनियम आहे. बाहेरून सोनेरी रंग असल्यामुळे त्यावर सोन्याची लेअर असल्यासारखे वाटते.

याचा उपयोग काय असतो?

याचा मुख्य उपयोग हा थर्मल कंट्रोलसाठी होतो. अंतराळात तापमान कधी जास्त तर कधी खूपच कमी असू शकते. यान कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे त्यावर तापमान ठरते. त्यामुळे यानाचे तापमान संतुलित ठेवण्याचे काम MLI करते.

आणखी काही उपयोग

चंद्राला स्पर्श करताना लँडरला चंद्राच्या धुळीपासून वाचवण्याचे देखील MLI काम करते. धुळीमुळे यानाचे सेन्सर आणि इतर लहान पण आवश्यक पार्ट खराब होत नाहीत.

सोनेरी रंगाची फॉईलच का?

अंतराळात सूर्यप्रकाशाच्या किरणोत्सर्गाशिवाय अनेक प्रकारचे किरणोत्सर्ग होतात. एक्स-रे, अल्ट्राव्हायोलेट किरणांसारख्या किरणोत्सर्गामुळे लागणाऱ्या गंजापासून सोनेरी फॉईल अंतराळयानाचे संरक्षण करते.

VIEW ALL

Read Next Story