विज्ञान विश्वात यशस्वी वैज्ञानिकांपैकी एक आईन्स्टाईला ओळखलं जातं.त्याने मांडलेल्या सिद्धांवर आजही अभ्यास करण्यात येतो.
असं म्हणतात की, आईन्स्टाईन यहुदी असल्याने त्याला जर्मनीतील नाझी पक्षाच्या जुलमांना सामोरे जावे लागले होते.
जर्मनीवर नाझी पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी आईन्स्टाईनच्या घरावर छापा टाकला. नाझी पक्षाच्या अन्याय आणि अत्याचाराने यहुदींच शोषण व्हायचं.
शोषित यहुदींसाठी स्वतंत्र इस्त्रायल राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी एका चळवळीत तो सक्रीय होता.
1947 मध्ये संयुक्त राष्ट्र एकत्र येत इस्त्रायलच्या भविष्याबद्दल निर्णय देणार होते.
त्यावेळी स्वतंत्र इस्त्रायलसाठी जागतिक पातळीवरील नेत्यांचं मत महत्त्वाचं होतं. इस्त्रायलच्या समर्थनासाठी आईन्स्टाईने नेहरूंना पत्र लिहिलं होतं.
भारताने इस्त्रायलच्या बाजूने का पाठिंबा द्यावा ? याबाबतचा मजकूर त्या पत्रात लिहिला होता.
आईन्स्टाईनच्या पत्राला उत्तर देत नेहरुंनी नम्रपणे नकार दिला. त्यावेळी भारताने जातीवाद आणि धर्मभेदाचे चटके सहन केले होते.
1947 मध्ये भारताची फाळणी झाल्याने कोणत्याही देशाची धर्मासाठी फाळणी होऊ नये अशी भारताची भुमिका होती.
स्वतंत्र इस्त्रायल राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी तेव्हा 13 देशांनी नकार दिला त्यात भारताचेही नाव होते.