चेरापुंजी नव्हे...

चेरापुंजी नव्हे, 'हे' आहे जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण; एकदा नक्की भेट द्या

Jun 30,2023

मान्सूनचे दिवस असो वा नसो...

जगभरातील हा एक भाग असा आहे जिथं मान्सूनचे दिवस असो वा नसो, पाऊस मात्र कायमच असतो

सर्वाधिक पावसाची जागा

जगातील सर्वाधिक पावसाची जागा अशीही या जागेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. मेघालयातील या ठिकाणी दरवर्षी साधारण 11802 मिलीमीटर इतका पाऊस होतो.

मेघालय

मेघालयआधी सर्वाधिक पाऊस असणाऱ्या ठिकाणांच्या यादीत चेरापूंजीचं नाव अग्रस्थानी होतं. पण, आता मात्र मॉसिनरामच आघाडीवर आहे. हे ठिकाण चेरापुंजीपासून 15 किमी अंतरावर आहे.

चेरापुंजी की सोहरा

चेरापुंजी की सोहरा या नावानंही हे ठिकाण ओळखलं जातं. स्थानिकांमध्ये हेच नाव प्रचलित आहे.

चेरापुंजी पिछाडीवर

हवामान विभागानं 1974 पासून 2022 पर्यंत नोंदवलेल्या माहितीच्या आधारे सध्या चेरापुंजीमध्ये मॉसिनरामहून 500 मिलीमीटर कमी पाऊस पडतो.

वातावरण ढगाळ

वर्षातील बहुतांश दिवस इथलं वातावरण ढगाळ असतं आणि वरुणराजा सतत बरसत असतो.

शेतीचं प्रमाण तसं कमीच

मॉसिनराममध्ये इतका पाऊस पडतो की इथं शेतीचं प्रमाण तसं कमीच. इतकंच काय, तर इथं भटकंतीसाठी येणारी मंडळीही अनेकदा या पावसात ओलीचिंब होतात.

निसर्गसौंदर्य

हो, पण इथल्या निसर्गसौंदर्याला कशाचीही तोड नाही. अशा या विविधतेनं नटलेल्या एका कमाल ठिकाणाला तुम्ही कधी भेट देताय?

VIEW ALL

Read Next Story