बाजारात टॉमेटोच्या किंमतीत वाढ झाली आहे.
किचनमधील टॉमेटो हा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक भाजीत टॉमेटोचा वापर आवर्जून करण्यात येतो
टॉमेटो महाग झाल्याने आता पदार्थांमध्ये त्याचा वापर मर्यादित करावा लागणार आहे. त्यामुळं भाजीची चव बिघडणार का,असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे
पण काळजी करु नका आता या टॉमेटोंच्या ऐवजी या पदार्थांचाही तुम्ही वापर करु शकता
ग्रेव्ही जाड व थोडी आंबड होण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करु शकता
डाळीत आंबटपणा येण्यासाठी तुम्ही टॉमेटो टाकत असाल तर त्या ऐवजी चिंचेचे पाणीही वापरु शकता
चिंचेचे पाणी आणि टॉमेटो नसेल तर तुम्ही दोन लिंबू पिळूनही टाकू शकता
भोपळ्याची पेस्ट करुन कढईत परतून घेतल्यानंतर ही पेस्ट भाजीत वापरु शकता
भाज्यांमध्ये थोडा आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर व कच्ची कैरीदेखील वापरु शकता.