Toll Tax Rules: 'या' लोकांना मिळते टोलमधून सूट; जाणून घ्या यादी!
भारतात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वाहनांना टोल टॅक्स द्यावा लागतो.
टोलची मोजणी वाहनाचा आकार आणि अंतर यावर केली जाते.
मोठ्या वाहनांसाठी जास्त टोल द्यावा लागतो. छोट्या वाहनांसाठी कमी टोल द्यावा लागतो.
पण ज्यांना टोल द्यावा लागत नाही, अशी कोणती लोक आहेत?
आपत्कालिन सेवांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडला टोल माफी दिली जाते.
सैन्य आणि रक्षा वाहनांना टोल द्यावा लागत नाही.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि व्हीआयपींना टोल द्यावा लागत नाही.
परमवीर चक्र आणि इतर वीरता पुरस्कारप्राप्त विजेत्यांना पत्र दाखवून टोल माफी देता येते.
राज्य परिवहनच्या बसेसकडून टोल घेतला जात नाही.
दुचाकी वाहनांकडून टोल घेतला जात नाही.
एखादे वाहन 24 तासात दुसऱ्यांदा टोलवरुन जात असेल तर दीडपट टोल घेतला जातो.