माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
विनोद आणि सचिन यांच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी खूपच अशक्त आणि वयापेक्षा जास्त मोठा दिसतोय.
एक काळ असा होता की, विनोद कांबळी हा सचिन तेंडुलकरपेक्षाही प्रतिभावान क्रिकेटपटू होता.
विनोद कांबळी प्रत्येक पैशासाठी हतबल आहे, पण एकेकाळी त्याची संपत्ती ही करोडोच्या घरात होती.
1991 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणारा विनोद कांबळी शिखरावर असताना त्याच्याकडे एक ते दीड कोटी डॉलर्सची संपत्ती होती.
विनोद कांबळीला इन्स्टाग्रामवर 98 हजार यूजर्स फॉलोवर्स आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार 2022 म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्याची वार्षिक त्याच्याकडे 4 लाख शिल्लक होते.
एका जुन्या मुलाखतीत खुद्द विनोद कांबळीने सांगितलं होतं की, भारतीय क्रिकेट बोर्डाकडून त्याला मासिक 30,000 रुपये पेन्शन मिळतात. या पैशात तो घर चालवतो.