योग्य झोप

झोप व्यवस्थित पूर्ण झाल्यास लक्ष केंद्रीत करण्यात मदत होते. त्यामुळे अभ्यासासह योग्य झोपही आवश्यक आहे.

Mar 09,2023

जिज्ञासा

हुशार विद्यार्थी नेहमीच नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच ते नेहमी प्रश्न विचारत असतात. आपल्या मनात येणाऱ्या शंका नेहमी विचारल्या पाहिजेत.

शांततेत अभ्यास

हुशार विद्यार्थी अभ्यास करताना शांतता असणारं ठिकाण निवडतात. या ठिकाणी टीव्ही, मोबाइल असं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी नसतात.

कठीण विषयांना प्राधान्य

हुशार विद्यार्थी नेहमी कठीण विषयाचा अभ्यास आधी सुरु करतात. सोप्या विषयांना ते नंतर प्राधान्य देतात.

वेळापत्रकानुसार अभ्यास

हुशार विद्यार्थी नेहमी अभ्यासाचं वेळापत्रक आखून ठेवतात. काहीही झालं तरी वेळापत्रकानुसार ते अभ्यास करतात.

एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत

एका अभ्यासानुसार, एकाच वेळी अनेक गोष्टी करणं अशक्य आहे. त्यामुळेच हुशार विद्यार्थी एकावेळी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करतात.

योग्य नियोजन

आपल्याला कधी आणि काय करायचं याचं हुशार विद्यार्थी आधीपासून प्लानिंग करतात. यामुळे त्यांना येणारे अडथळेही कमी असतात.

VIEW ALL

Read Next Story