भारतातील 'हे' ठिकाणं आहेत धोकादायक!

Jul 01,2024

रूपकुंड तलाव

उत्तराखंडमधील रूपकुंड तलाव हे कंकाल तलाव म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी शेकडो वर्ष जुने मानवी सांगाडे सापडल्याने हे ठिकाण अधिक धोकादायक बनले आहे.

सिंधू खोरे

लडाखमध्ये असलेले सिंधू खोरे हे दुर्गम रस्ते आणि डोंगराळ भागांसाठी ओळखले जाते. येथील रस्ते अरूंद आणि उंच असल्याने प्रवास करणे जोखमीचे असते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे बिबट्यांचा वावर असल्याने हे ठिकाण धोकादायक समजले जाते. बिबट्याने मानवावर हल्ला केल्याच्या अनेक घटना इथे घडल्या आहेत.

थार वाळवंट

राजस्थानमधील थारचे वाळवंट हे अति उष्णतेसाठी आणि वाळूच्या वादळासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वातावरण अतिशय उष्ण असते.

सिंगभूम जिल्हा

झारखंडमधील सिंगभूम जिल्हा हा घनदाट जंगलाने विभागलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आढळून येतात. इथे अनेक हत्तींच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे हे ठिकाण अधिक धोकादायक बनले आहे.

कच्छ प्रदेश

गुजरातमधील कच्छ या ठिकाणी सतत होत असलेल्या भूकंपामुळे हे ठिकाण धोकादायक मानले जाते. 2001मध्ये झालेल्या भूकंपामुळे या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता.

अंदमान आणि निकोबार बेटे

या ठिकाणी रहिवासी असलेले जारवा जमातीचे लोक बाहेरील जगाशी संपर्क साधत नाही . तेथील लोक बाहेरच्या लोकांना शत्रू मानतात. म्हणून तिथे जाणे धोक्याचे ठरू शकते.

VIEW ALL

Read Next Story