दीर्घायुष्यासाठी जपानी नागरिकांच्या या 4 सवयी अंगीकारा, आजार होतील दूर

युमी यामामोटो जपानच्या लोंगेवीक्सेस्ट ग्रुपचे चेअरमॅन असून ते सर्वाधीक वयाच्या नागरिकांचा डेटा एकत्रित करत आहेत.

ही संस्था जगातील सर्वात वृद्ध नागरिकांच्या वयाची पुष्टी करुन त्यांची लाइफस्टाइल कशी आहे आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य उलगडतात.

त्यांनी 110 वर्षाहून अधिक जगणाऱ्या व्यक्तींचा डेटा एकत्र केला आहे आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगितले आहे.

यात जपानमधील सर्वात वृद्ध नागरिकदेखील सहभागी आहेत. फुसा तात्सुमी असं यांचे नाव असून त्यांनी अलीकडेच त्यांचा 116वा वाढदिवस साजरा केला आहे.

जपानच्या नागरिक दीर्घायुषी असतात ते त्यांच्या सवयीमुळं या सवयींबद्दल जाणून घ्या.

जपानमध्ये एक म्हण आहे, त्यानुसार, तुमची जितकी भूक आहे त्याच्या 80 टक्क्यांपर्यंतच पोट भरुन जेवलं पाहिजे. बाकी 20 टक्के पोट खाली ठेवणे

संयम ठेवावा कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करु नये. जपानच्या दुसरे सर्वात वृद्ध व्यक्ती केन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना रोज कोल्ड्रिंक्स प्यायची सवय आहे पण ते त्याचा अतिरेक करत नाही.

जपानी लोक जिम जाण्यापेक्षा चालणे, जिना चढणे व उतरणे आणि आउटडोर वर्कआउट करतात.

जपानी लोक बसताना किंवा चालताना पाठीचा कणा ताठ ठेवतात. त्यामुळं वयानुसारही ते वाकून चालताना दिसत नाही ते अगदीच सरळ चालतात.

VIEW ALL

Read Next Story