पेमेंट करताना खबरदार

IRCTC कडून युजर्सची वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड नंबर किंवा बँक अकाऊंट याची माहिती विचारला जात नाही. केवळ तिकिट बूक ही माहिती आवश्यत असते.

या गोष्टींची काळजी घ्या?

बोगस बेवसाईटपासून वाचण्यासाठी Google Play Store किंवा Apple App Store वरुनच IRCTC ची वेबसाईट डाऊनलोड करा

बोगस वेबसाईट वाटते खरी

ही वेबसाईट एकदम खरीखुरी वाटते. त्यामुळे युजर्स आपल्या बँक अकाऊंटसह सर्व वैयक्तिक माहिती या लिंकवर टाकतात.

लिंकवर क्लिक केल्यास फसवणूक

ही बोगस बेवसाईट डाऊनलोड केल्यानंतर फोनमध्ये आपोआपल एक मालवेअर इन्स्टॉल होतं. त्यानंतर युजर्सचा संपूर्ण डेटा चोरला जातो. त्यानंतर तुमचं बँक खातं रिकामं केलं जातं

फेक होस्ट वेबसाईट

याशिवाय एक होस्ट फेक वेबसाईटसुद्ध आहे. URL https://irctc.creditmobile.site असं या वेबसाईटचं नाव आहे. या लिंकच्या माध्यमातून हॅकर्स युजर्सची फसवणूक करतात.

अँड्राईड युजर्ससाठी इशारा

विशेषत: IRCTC ने अँड्रॉईड युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. irctcconnet.apk असं बोगस साईटचं नाव असून याची लिंक व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामवर शेअर केली जात आहे.

युजर्सचा डेटा धोक्यात

हॅकर्सनी IRCTC च्या नावाने बनावट बेवसाईट आणि अॅप बनवले आहेत. ही साईट आणि अॅप हुबेहुब असून या माध्यमातून युजर्सचा डेटा चोरला जात आहे.

IRCTC चा इशारा

IRCTC ने एक पत्रक काढून प्रवाशांना सूचना केल्या आहेत. विशेषत: ऑनलाईन तिकिट काढणाऱ्यांसाठी इशारा देण्यात आला आहे

VIEW ALL

Read Next Story