एसपीजी कमांडो बनण्यासाठी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षण असणे गरजेचे आहे.
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने निर्धारित वयोमर्यादा, फिटनेस याची पूर्तता करणे आवश्यक आहे.
सर्वात आधी बीएसएफ, सीआरपीएफस,आयटीबीपी,सीआयएसएफ किंवा एसएसबीसारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असणे आवश्यक आहे.
या दलांचे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. यानंतर कठोर ट्रेनिंग होईल. यामध्ये तुमचे असाधारण काम दिसायला हवे.तुमच्याकडे टीम वर्क असायला हवे.
नियमित व्यायाम आणि ट्रेनिंगने तुम्ही स्वत:ला शारीरिकदृष्ट्या फिट ठेवू शकता. कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा.
एसपीजी कमांडोसाठी अंतर्गत नियुक्ती होते. सीएपीएफमध्ये असताना या भरतीवर लक्ष ठेवा आणि अर्ज करा.
शारीरिक, मानसिक, वैद्यकीयच्या कठीण चाचण्यातून जावे लागते.
निवडीनंतर तुम्हाला वेगळी ट्रेनिंगदेखील दिली जाते. ज्यामध्ये तुम्हाला जबाबदार नोकरीसाठी तयार केले जाते.
तुमचा वैयक्तिक सिक्योरिटी रेकोर्ड बनवून ठेवा आणि सिक्योरीटी प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करा.