भारतीय निवड समितीच्या निर्णयानुसार असे दिसून येते की, पुजारा, रहाणे आणि धवन यांना संधी द्यायची नाही. त्यामुळे या तिघांनी टीम इंडियात पुनरागमनाची आशा सोडायची का?
या तिघांसाठी संघात ज्या पद्धतीने पर्याय तयार करण्यात आले आहेत. ते पाहता त्यांना पुन्हा बोलवण्याचा भारतीय निवड समितीचा विचार नसल्याचे दिसून येते.
दुलीप करंडक स्पर्धेचे आयोजन 5 सप्टेंबरपासून होणार असून त्यासाठी चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण यामध्ये चेतेश्वर पुजारा, रहाणे आणि शिखर धवनचे नाव दिसत नव्हते.
चेतेश्वर पुजाराने जून 2023 मध्ये भारतासाठी शेवटची कसोटी खेळली आणि रहाणेने जुलै 2023 मध्ये शेवटची कसोटी खेळली. तर धवन 2018 पासून कसोटी खेळलेला नाही.
अशा परिस्थितीत टीम इंडियातून बाजूला झालेल्या या तिन्ही खेळाडू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार केल्यास आश्चर्य वाटणार नाही.
मात्र, चांगली गोष्ट म्हणजे पुजारा आणि रहाणेचा खेळ आजही रणजी स्पर्धेत बघायला मिळतो.