हिजाब घालून म्हणते भजन, मुंबईतून अयोध्येला निघालेली शबनम आहे तरी कोण?

Shabnam Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शबनम ही मुस्लिम मुलगी मुंबई ते अयोध्या पायी प्रवासाला निघाली आहे.

शबनमने कमरेवर श्रीरामाचा झेंडा घातला असून तिला अयोध्येच्या राम मंदिरात रामललाचे दर्शन घ्यायचे आहे.

शबनमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रस्त्यावरुन पायी चालताना दिसत आहे.

शबनम शेख ही मुंबईची रहिवासी आहे. ती ईश्वर शर्मा नावाच्या तरुणासोबत ओपन रिलेशनशिपमध्ये आहे.

शबनम शेख बुरखा, हिजाब घालते आणि साडी, लेहेंगा देखील परिधान करते. ती स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवते.

ईश्वर शर्मा हा बिहारचा असून दिल्लीत राहतो. शबनम मुंबईत राहते पण त्यांचे प्रेम कायम आहे.

शबनम म्हणते की मी राष्ट्रवादी आहे. माझ्यात राष्ट्रभक्तीचे रक्त आहे. माझ्यासाठी देशभक्ती प्रथम येते.

शबनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे.

मुस्लिम मुलगी असूनही माझी प्रभु श्रीरामावर श्रद्धा आहे. त्यामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय, असे शबनम सांगते.

VIEW ALL

Read Next Story