Semicolon टॅटू काढताय; आधी जाणून घ्या त्याचा अर्थ!

टॅटू काढण्याचा ट्रॅड सध्या युवकांमध्ये जास्तच वाढत आहे. आपली आवडती वस्तू किंवा आपल्या आयुष्याशी निगडीत गोष्टीची आठवण म्हणून टॅटू काढतात.

टॅटू काढत असताना आजकाल तरुणपिढी त्यांच्या स्वभावानुसार किंवा पर्सनॅलिटीच्या संबंधित टॅटू काढतात.

अशातच सध्या सेमीकॉलन टॅटूचा ट्रेंड वाढतोय. तसं तर सेमीकॉलनचा अर्थ अर्धविराम असा आहे. पण लोक शरीरावर Semicolon टॅटू का बनवतात, जाणून घेऊया.

Semicolon टॅटूच्या मागे एक गंभीर कारण दडले आहे. जाणून घेऊया याचा अर्थ

द माइंड जर्नलच्या माहितीनुसार, अर्धविराम म्हणजेच Semicolon टॅटूला अर्थ मेंटल हेल्थसोबत लढणाऱ्या लोकांप्रती असलेली एकता दर्शवते.

किंवा जी लोक रोजच्या जीवनात जगण्यासाठी संघर्ष करतात आणि हार पत्करत नाही, अशा लोकांसाठीही हा टॅटू खास आहे.

सोप्या शब्दात या टॅटूचा अर्थ असा की संघर्षानंतरही मी अजून हारलो नाहीये माझी लढाई असून सुरूच आहे.

VIEW ALL

Read Next Story