नव वर्षापूर्वीच SBI कडून खातेधारकांना खास भेट; FD वरील व्याजदरवाढ अखेर लागू
एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरांमध्ये वाढ केली असून, 2 कोटींपेक्षा कमी रकमेवर ही व्याजदरवाढ 27 डिसेंबरपासून लागू करण्यात आली. यापूर्वी बँक ऑफ इंडिया, डिसीबी बँक, फेडरल बँकेकडून व्याजदरवाढ करण्यात आली होती. या यादीत आता एसबीआयचं नावही जोडलं गेलं आहे.
एसबीआयकडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.50% व्याज, 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.75% व्याज आणि 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 5.75% व्याज दिलं जाणार आहे.
211 दिवस ते 1 वर्षाहून कमी कालावधीसाठीच्या एफडीवर 6% व्याज, 1 वर्ष ते 2 वर्षाहून कमी कालावधीच्या एफडीवर 6.80% व्याज आणि 2 वर्षे ते 3 वर्षांहून कमी कालावधीच्या एफडीवर 7.00% व्याज दिलं जाईल.
3 वर्ष ते 5 वर्षांच्या एफडीवर 6.75% टक्के व्याज आणि 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर बँक 6.50% व्याज देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर बदललेले असतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4% व्याज, 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याद आणि 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 6.25% व्याज, तर 211 दिवस ते 1 वर्षाहून कमी काळाच्या एफडीवर 6.5% व्याज दिलं जाणार आहे.
1 वर्ष ते 2 वर्षांहून कमी काळाच्या एफडीवर 7.30% व्याज, 2 वर्ष ते 3 वर्षांहून कमी काळाच्या एफडीवर 7.50% व्याज, 3 वर्षे ते 5 वर्षांहून कमी काळासाठीच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज आणि 5 ते 10 वर्षांसाठीच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज दिलं जाणार आहे.