Railway Station : तुम्हीही असा एखादा प्रवास केला असेल जिथं पोहोचलं असता किंवा पोहोचण्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणाविषयी सांगून सतर्क करण्यात आलं असेल.
आपण इथं बोलतोय भारतातील काही अशा रेल्वे स्थानकांविषयी जिथं म्हणे अनेक प्रवाशांना विचित्र अनुभव आले आहेत. प्रत्येकानं या अनुभवांना वेगवेगळी नावंही दिली आहेत. चला पाहुया ही रेल्वे स्थानकं...
मध्य प्रदेशातील सोहागपूर येथील रेल्वे स्थानकाबद्दलही अशाच काही भयावह गोष्टी सांगितल्या जातात. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)
मध्य प्रदेशातील पातालपानी या रेल्वे स्थानकावर काही विचित्र आवाज ऐकू येतात असं स्थानिकांचं मत.
पंजाबच्या लुधियाना या रेल्वे स्थानकावर संध्याकाळच्या वेळी अनेकांना अनपेक्षित घटनांनी गाठल्याचा दावा केला जातो.
हिमाचल प्रदेशाल सोलन येथे असणाऱ्या बडोग या रेल्वे स्थानकाच्या आजुबाजूच्या निसर्गापेक्षा जास्त चर्चा होते ती इथल्या भयाण वातावरणाची.
आंध्र प्रदेशातील चित्तूर या रेल्वे स्थानकावर ये- जा करताना अनेकांनीच काहीतरी विचित्र घडल्याची माहिती अनेकदा दिलीये.
पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे असणारं बेगुनकोदर रेल्वे स्थानक अनेकांनाच धडकी भरवतं.
उत्तर प्रदेशातील नैनी या रेल्वे स्थानकावर काही विचित्र अनुभूती झाल्याचा दावा काही प्रवासी करतात.
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकाविषयी अनेक कथित गोष्टी सांगितल्या जातात. असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळी इथं काहींनी किंकाळ्या ऐकल्या आहेत.