सोन्याच्या दागिन्यांवर Tax लागतो?

Gift म्हणून मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांवर Tax लागतो? पाहूनच घ्या नियम

Jul 18,2023

आश्चर्य

जाणून आश्चर्य वाटेल, पण भारत एक असा देश आहे जिथं मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं.

सोनं खरेदी

लग्नसमारंभ किंवा वाढदिवस, शुभप्रसंगी सोनं खरेदी करण्याला फार पूर्वीपासूनच प्राधान्य दिलं जात आहे.

सोन्याची भेटवस्तू

तुम्हाला ठाऊक आहे का, सोन्याची भेटवस्तू करमुक्त नाही. एका ठराविक मर्यादेनंतर दागिन्यांवरही कर आकारला जातो.

दागिना

कुटुंबातील सदस्यांकडूनच विवाह समारंभ, वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रमासाठी सोन्याचा दागिना भेट मिळाल्यास तो करमुक्त असतो.

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला...

किंबहुना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळालेल्या दागिन्यांवरही कर आकारला जात नाही. पण, त्यांची विक्री करायची झाल्यास मात्र कर भरावा लागतो.

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स

अशा प्रसंगी लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स देणं बंधनकारक असतं. यासाठी होल्डिंग पिरियड ग्राह्य धरला जातो.

उदाहरणार्थ ...

उदाहरणार्थ आजोबांनी दिलेले दागिने तुमच्या आईनं तुम्हाला लग्नात दिले. त्यांनी ते त्या काळात 1 लाख रुपयांना खरेदी केले असल्यास कॅपिटल गेन ठरवण्यासाठी त्यांची प्राथमिक किंमत 1 लाख रुपये असेल.

कॅपिटल गेन

यानंतर दागिन्यांच्या सध्याच्या दरातून 1 लाख रुपये वजा करण्यात येतील आणि कॅपिटल गेन ठरवण्यात येईल. वरील वाढीव किमतीवर कर भरावा लागेल.

होल्डिंग पिरियड

होल्डिंग पिरियड 36 महिन्यांहून जास्त असल्यास लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि 36 महिन्यांहून कमी कालावधीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल.

VIEW ALL

Read Next Story