यंदाचा प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 10 वाजता विजय चौक इथून सुरू होणार असून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नॅशनल स्टेडियमवर संपणार आहे. तुम्हालाही परेड पाहायचं असल्यास ऑनलाईन तिकीट बुक करता येईल.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी भारतीय नागरिक आरक्षित, अनारक्षित सीट मिळवू शकतात. या तिकिटाची किंमत 100 ते 20 रुपये असते.
तिकिटांचे बुकिंग 10 जानेवारीपासून सुरू झाले असून ते 25 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. प्रत्येक दिवशी काही मर्यादित संख्येत तिकीट उपलब्ध असणार आहेत.
यासाठी आधी तुम्हाला संरक्षण मंत्रालयाच्या www.aamantran.mod.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुम्हाला सगळी माहिती भरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला त्या वेब पोर्टलवर अनेक कार्यक्रमांची यादी दिली जाईल. त्यापैकी तुम्ही एफडीआर प्रजासत्ताक दिवस परेड, प्रजासत्ताक दिवस परेड आणि बीटींग द स्ट्रीट असे पर्याय दिसतील.
तुम्ही यापैकी एका कार्यक्रमाची तिकीट ऑनलाईन मिळूव शकता. यासाठी तुम्हाला तिथे तिकिटासाठीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने द्यावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही ऑनलाईन तिकीट मिळवू शकता.
इतकंच नव्हे तर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढता येत नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील तिकीट काढू शकता.