याचा अर्थ जर तुमचे पंजोबा, आजोबा यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसा जमा केला असेल आणि कायदेशीरपणे तुमचा त्याच्यावर हक्क असतानाही जर तुम्हाला याची माहिती नसेल तर ते तुम्हाला मिळू शकतात.
RBI च्या गव्हर्नरने दिलेल्या माहितीनुसार, अशा डिपॉझिट आणि त्याच्या डिपॉझिटरच्या योग्य आकडेवारीची माहिती मिळवण्यासाठी एक वेब पोर्टल तयार करण्यात आलं आहे. यासह Unclaimed Deposit संबंधी योग्य माहितीसह वेगवेगळ्या बँकांमधील डिपॉजिटरचीही माहिती मिळू शकेल.
यासह सध्या Unclaimed Deposit खातीही कायदेशीर हक्क असणाऱ्यांपर्यंत पोहोचावीत यासाठी राष्ट्रीय बँकेकडून प्रयत्न सुरु आहेत.
गुरुवारी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशा खात्यांसंबंधी आखलेल्या योजनेची माहिती दिली. आम्ही असं पाऊल उचलत आहोत, ज्यामुळे नव्या डिपॉजिट्सचा पैसा Unclaimed Deposit मध्ये जाऊ नये असं त्यांनी सांगितलं.
RBI साठीही अशा खात्यांवर कायदेशीर हक्क असणाऱ्यांची माहिती मिळवणं फार जिकिरीचं काम असतं. पण आता मात्र एका निर्णयामुळे सहजपणे त्यांची माहिती मिळवण्याची शक्यता आहे.
Unclaimed Deposit म्हणजे अशी खाती आहेत, ज्या खात्यांमध्ये गेल्या 10 वर्षात कोणताही व्यवहार झालेला नाही.
याचा अर्थ इतकी मोठी रक्कम बँकांमध्ये Unclaimed Deposit आहे. यामध्ये एसबीआयपासून ते आयसीआयसीआय बँकेपर्यंतची खाती आहेत.
सरकारकडून नुकतीच संसदेत देशातील वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा असलेल्या 35 हजार 12 कोटी रुपयांवर कोणीही दावा करत नसल्याची माहिती देण्यात आली आहे.