बटाटे खाल्ल्यास पचनासाठी 90 ते 120 मिनिटांचा वेळ लागतो
पाणी पचण्यासाठी काही वेळ लागत नाही.
दुग्धजन्य पदार्थांच्या पचनासाठी 120 मिनिटं लागतात.
सुका मेवा पचण्यासाठी 180 मिनिटं लागतात.
कलिंगड, टरबूज आणि खरबूज सामान्यतः 20 मिनिटात पचतात तर, संत्री, द्राक्ष आणि केळी यांसारखी फळे पचण्यासच सुमारे ३०-३५ मिनिटे लागतात तर सफरचंद, नाशपाती, चेरी, किवी यांना पचण्यास ४० मिनिटे लागतात.
शाकाहाराच्या तुलनेत मांसाहार पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. यामुळेच चिकन पचण्यासाठी 90 ते 120 मिनिटं लागतात.
गोमांस खाल्ल्यास तब्बल 180 मिनिटं पचनासाठी लागतात.
पालेभाज्या, कोबी आणि फ्लॉवर सारख्या शिजवलेल्या पालेभाज्या पचायला अंदाजे 40-50 मिनिटे लागतात. तर , बीटरूट, रताळे, मुळा आणि गाजर यासारख्या मूळ भाज्या एका तासात पचतात.
साधारणपणे, मासे पचवण्यासाठी तुमच्या पोटाला सुमारे ४५ ते ६० मिनिटे लागतात. तथापि, मासे पचण्यासाठी चा लागणारा अचूक वेळ प्रत्येकच्या शरीरातील वेगवेगळ्या घटकानुसार बदलू शकतो. सर्वसाधारणपणे, मासे हे पचण्यास तुलनेने सोपे अन्न मानले जाते आणि बहुतेक लोकांमध्ये ते पचनविषयक समस्या निर्माण करत नाही.