अगदीच कलात्मक काहीतरी करण्याच्या विचारात असाल, तर एका पानावर जणू प्रभू रामाचं नाव लिहिलं आहे असं भासवणारी ही रांगोळीही तुम्ही काढू शकता.
फक्त धनुष्यबाण आणि त्याचाच आधार घेत लिहिलेली ही अक्षरं, ही रांगोळी कशी वाटतेय?
सुरेख रंगसंगतीत साकारलेली ही रांगोळी पाहताना त्यात प्रभू रामाची आकृती लक्ष वेधत आहे.
काही रंग चाळणीनं अमूक एका रचनेत पसरून त्यावर पांढऱ्या रंगाने 'जय श्री राम' असं लिहिल्यासही तुम्ही एक छानशी रांगोळी साकारू शकता.
अगरबत्तीची लहानशी काठी आणि रांगोळीचे ठिपके या माध्यमातूनही तुम्ही सुरेख रांगोळी साकारू शकता.
लाल, पिवळ्या रंगसंगतीला काळ्या रंगाची जोड देत त्यात करंगळी किंवा एखाद्या लहानशा काठीच्या सहाय्यानं तुम्ही रामाची प्रतीमा साकारू शकता.