1661 साली पोर्तुगालचा राजा किंग जॉन चौथा याने बॉम्बे नावाचं हे बेट (जी मूळ मुंबई समजली जातं) इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याला हुंड्यात भेट म्हणून दिलेलं. चार्ल्स आणि किंग जॉन चौथा याची मुलगी कॅथरीन ब्रिगेंझाचं लग्न झालं होतं. 1534 ते 1665 दरम्यान या 7 बेटांवर पोर्तुगीज लोकांचं राज्य होतं.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर अशीही मुंबईची ओळख आहे. मुंबईची लोकसंख्या 2022 साली फेब्रुवारीमधील आकडेवारीनुसार 2 कोटी 1 लाख 85 हजारांहून अधिक होती. हे दिल्लीनंतर भारतातील दुसरं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे.
मुंबईत 3 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यांची नावं पुढील प्रमाणे : एलिफंटा बेटांवरील एलिफंटा गुहा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, व्हिक्टोरियन गॅथोलिक आर्ट डेको शैलीमध्ये बांधण्यात आलेल्या वेगवेगळ्या इमारती.
जगातील सर्वात महागडं घर हे मुंबईतच आहे. रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानींचं अँटेलिया या आलिशान घराची किंमत अंदाजे 15 हजार कोटी रुपये इतकी आहे.
मुंबई हे शहर माहीम (Mahim), वरळी (Worli), परळ (Parel), माझगाव (Mazgaon), मुंबई (Bombay), कुलाबा (Calaba), छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island) या सात बेटांपासून तयार झालं आहे.
जगातिक सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक मुंबईत आहे. धारावी झोपडपट्टीमध्ये 7 ते 10 लाख लोक राहतात. ही आशियामधील सर्वात मोठी तर जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.
मुंबईचं पूर्वीचं नाव बॉम्बे असं होतं. 1995 पर्यंत बॉम्बे हेचं नाव या शहराला होतं. या शब्दाचा अर्थ छान छोटीशी जागा असा होतो. महाराष्ट्र सरकारने 1995 साली हे नाव बदलून मुंबई असं केलं. मुंबा देवी या ग्रामदेवतेच्या नावावरुन मुंबई हे नाव ठेवण्यात आलं.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? आम्ही जे फॅक्ट सांगणार आहोत त्यापैकी शेवटचा फॅक्ट तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल याची खात्री आहे.