गर्दीचं प्रमाण पाहता, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शहरात 2,060 पोलिस तैनात करण्यात आले होते.
मोदींना पाहण्यासाठी उत्साही भाजप कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्षाचे झेंडे घेऊन रांगेत उभे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्याभोवती सुरक्षा गराडा घातला होता. त्यानंतर पीएम मोदी एसयूव्हीमध्ये बसले आणि लोकांना अभिवादन केलं.
केरळच्या विविध भागातून आलेले लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी तासनतास रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत उभे होते.
केरळचा पारंपारिक पेहराव कासवू मुंडू परिधान करून पीएम मोदींनी चालत रोड शोला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5 वाजल्यानंतर कोची येथील नौदल हवाई स्थानकावर दाखल झाले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. 24 ते 25 एप्रिल या दोन दिवशी पंतप्रधान केरळमध्ये असतील.
पारंपारिक पोशाख, हजारोंची गर्दी अन् फुलांचा वर्षाव, मोदींचा जलवा कायम!