पहिल्यांदा Income Tax भरताय? 'या' गोष्टी अजिबात विसरु नका

Jun 28,2024


करदात्यांना कर कायदे, वजावट आणि इतर सवलतींची माहिती असणं अपेक्षित आहे. जेणेकरून ते फाइलिंग प्रक्रियेचे पालन करू शकतील.

फॅार्म 16

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी ITR दाखल करण्याची पहिली पायरी म्हणजे फॉर्म-16. हा एक सर्वसमावेशक दस्तऐवज आहे. ज्यामध्ये आयकर रिटर्न भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि त्यामध्ये A आणि B असे दोन भाग असतात.

कर प्रणाली

जुन्या आणि नवीन अशा दोन प्रकारच्या कर पद्धती सध्या देशात अस्तित्वात आहेत. तुम्ही कोणती कर पद्धत निवडता यावर तुमचे लक्ष असणे महत्त्वाचे. दोन्ही पद्धतींसाठी कराची रक्कम वेगळी आहे.

कर व्यवस्था

जुन्या कर व्यवस्थेमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर सूट दिली जाते. नवीन कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.

एकूण करपात्र उत्पन्न

करदात्यांना स्‍टँडर्ड डिडक्‍शन प्रणालीबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या करपात्र उत्पन्नापर्यंत पोहोचल्यास, स्‍टँडर्ड डिडक्‍शन आणि एकूण कर सूट तुमच्या एकूण उत्पन्नातून वजा करणे आवश्यक आहे.

फॉर्म 26AS

फॉर्म 26AS वार्षिक कर विवरण म्हणून काम करते, ज्यामध्ये कर कपात आणि उत्पन्नाचे स्रोत हे महत्त्वाचे तपशील असतात. पगाराचे उत्पन्न, व्यवसाय फायदे आणि बँक गुंतवणुकीतून मिळणारा व्याज आणि इतर महसूलबद्दल यातून माहिली मिळते.

वार्षिक उत्पन्न विवरण (AIS)

हा फॉर्म करदात्यांच्या आर्थिक विवरणांचा सर्वसमावेशक सारांश आहे. यामध्ये स्रोतावरील टीडीएस, कर संकलन (TCS), व्याज आणि म्युच्युअल फंड व्यवहारांची मिळते.


तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाइटवर 26AS आणि AIS फॉर्म डाउनलोड करू शकता.

आवश्यक कागदपत्रे

पॅन कार्ड, आधार कार्ड, फॅार्म 16, फॉर्म 26AS, व्याज प्रमाणपत्र, वार्षिक माहिती स्टेटमेंट, कर बचत गुंतवणूक आणि एक्‍सपेंडेचर पुरावा आणि गृह कर्ज स्टेटमेंट इत्यादी महत्त्वाची कागदपत्र सोबत बाळगा.

VIEW ALL

Read Next Story