आई आपल्या मुलाशी कळत-नकळ अनेक गोष्टी बोलते. पण काही गोष्टी बोलणे तिने जाणिवपूर्वक टाळले पाहिजे.
या गोष्टींमुळे मुलाच्या मनाला ठेच पोहोचू शकते आणि त्याचे अंतर्मन दुखू शकते.
आईने मुलगा अथवा मुलीशी बोलू नयेत अशा कोणत्या गोष्टी आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
मुलींसारखा काय रडतोस? असे म्हणून मुलाच्या भावना कधी दाबू नये.
आई असं बोलली तर त्याचे हृदय तुटते. आपल्याला कोणी समजून घेत नाही अशी भावना त्याच्या मनात येते.
तुझ्या भावा किंवा बहिणीसारखा हुशार बन, अशी तुलना करु नये.
शिक्षणात हुशार नसेल तर मुलाची अशी तुलना केली जाते. ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होतात.
मुलगा कॉलेजमध्ये शिकतोय, किंवा त्यानंतर अभ्यासासाठी वेळ घेतोय तर त्याला सारखे टोमणे मारु नये.
मुलाने लवकर शिक्षण पूर्ण करुन जबाबदारी घ्यावी, असा प्रेशर त्याच्यावर निर्माण केला जाऊ नये.
बहिणीशी भांडण झाले तरी चुकी मुलाचीच असेल, असे आईने सारखे म्हणू नये. मुलावर विश्वास ठेवायला हवा.
मुलगा काय म्हणतोय हे ऐकून आणि समजून घ्या, यातच मुलाचा आनंद आहे.