अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल अव्वल स्थानी आला आहे.
शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकत हा पराक्रम केला आहे. अवघ्या 41 डावांमध्ये शुभमनने ही झेप घेतली आहे.
दुसरीकडे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही गोलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
मोहम्मद सिराजने पाकिस्तानी वेगवाने गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला मागे टाकलं आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही भारतीय अव्वल स्थानी आहेत.
वर्ल्ड कप 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ आपले 8 पैकी 8 सामने जिंकून पहिल्या स्थानी आहे.
मात्र केवळ वर्ल्ड कपच नाही तर इतर अनेक बाबतीत भारतीय अव्वल स्थानी आहे. भारतीय खेळाडू कशाकशात अव्वल आहेत पाहूयात...
सध्या भारतीय कसोटी संघ हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी संघ आहे.
एकदिवसीय क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे.
टी-20 मध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये जगातील पहिल्या क्रमाकांचा गोलंदाज हा भारताचा रविचंद्रन अश्वीन आहे.
जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हा भारताचाच आहे. या खेळाडूचं नाव आहे रविंद्र जडेजा.
टी-20 क्रिकेटमधील पहिल्या क्रमाकांचा फलंदाज हा भारताचा सुर्यकुमार यादव आहे.
यावरुनच भारतीय संघाचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा दिसून येतो.