मुलांना प्रामाणिक आणि स्मार्ट बनवायचं आहे का? मग 'या' गोष्टींची काळजी घ्याच

Dec 01,2023

लहान मुलं देशाचं भविष्य

लहान मुलं ही कोणत्याही देशाचं भविष्य असतात. यातील काही मोठे झाल्यावर देश चालवतात तर काहीजण देशाला पुढे नेण्याचं काम करतात.

त्यामुळे ही मुलं हुशार आणि प्रामाणिक व्हावीत असं वातावरण त्यांना देणं गरजेचं असतं.

मुलांना हुशार आणि प्रामाणिक करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे.

मुलांशी प्रामाणिक राहा

मुलं प्रामाणिक व्हावीत अशी इच्छा असेल तर तुम्हीही त्यांच्यासोबत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. तसंच चूक झाल्यास त्यांच्यासमोर मान्य करा. मुलं पालकांकडे पाहूनच शिकत असतात.

प्रश्नांपासून दूर ठेवू नका

मुलं नव्या विषयांवर प्रश्न विचारतील असं वातावरण निर्माण करा. मुलं रोज नवीन गोष्टी शिकत असतात, त्यामुळे त्यांना प्रश्नांपासून दूर ठेवू नका.

सर्व विषयांवर चर्चा करा

मुलांना पुस्तकं वाचायला द्या. त्यांच्यावर कोणत्याही विषयावर चर्चा करा आणि मनात निर्माण होणाऱ्या कुतुहूलाचं समर्थन करा. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्या.

निर्णय घेऊ द्या

मुलांना आव्हानांचा सामना करायला शिकवा. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. यामुळे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते.

भावना व्यक्त करु द्या

मुलांसाठी असं वातावरण निर्माण करा ज्यामध्ये त्यांना आपल्या भावना व्यक्त करताना असुरक्षित वाटणार नाही. त्यांना आपलं म्हणणं मांडू द्या. त्यांच्या भावनांचा आदर करा.

विश्वासाचा पाया रचा

मुलांना खरं बोलायला शिकवा. प्रामाणिक राहिल्यास वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी विश्वासाचा पाया ठेवतात हे त्यांना शिकवा.

VIEW ALL

Read Next Story