भारत आणि पाकिस्तानात सध्या सीमा हैदर आणि सचिन मीणाच्या लव्ह स्टोरीची चांगलीच चर्चा आहे
वास्तविक सीमा हैदरकडे काही पासपोर्ट मिळाले आहेत. त्यामुळे सीमा तपास यंत्रणेच्या रडारवर आहे
सीमा हैदार विजा नसताना पाकिस्तानातून भारतात आशी कशी? हे समझण्यापलीकडे आहे असा प्रश्न एका पाकिस्तानी पत्रकाराने उपस्थित केला आहे.
सीमाचा पहिला पती गुलाम हैदर कराचीत रिक्षा चालवायचा. पण कुटुंबासाठी जास्त पैसे कमवण्यासाठी तो सऊदी अरेबियाला गेला.
गुलाम हैदराने पैसे कमवत कुटुंबासाठी कराचीत घर बनवलं. पण ते घर विकून सीमा पैसे आणि मुलांना घेऊन भारतात पळून आली.
सीमा हैदरला आपल्या प्रियकराला भेटायचं होतं तर ती गैरमार्गाने भारतात का आली? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय.
या दरम्यान पाकिस्तानी युट्यूबर शोएब मलिकने एक खळबळजनक दावा केला आहे. सीमा हैदर पाकिस्तानी एजंट असू शकते असा दावा त्याने केलाय.
युट्यूबर शोएबच्या म्हणण्यानुसार असा नवा ट्रेंड सेट होईल. कधी पाकिस्तानची मुलगी भारतात जाईल, तर कधी भारतातली मुलगी पाकिस्तानात येईल
पाकिस्तानात महिलांची स्थिती वाईट असल्याचं सीमा हैदर प्रकरणाने पुन्हा एकदा समोर आलं आहे.
सीमाच्या भारतात येण्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होतायत. यादरम्यान आपण पाकिस्तानला पुन्हा जाणार नसल्याचं सीमा हैदरने सांगितलं आहे.