एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि पती मुकेश अंबानीसोबतच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलंय.
घरी असताना कशा राहतात? कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात? यावर त्यांनी खुलासा केलाय.
मुकेश अंबानी आणि मला स्ट्रीट फुट खायला आवडतं. असं नीता अंबानी सांगतात.
आम्हाला दोघांना देखील हिंदी गाणी ऐकायला आवडतात, असंही त्या म्हणाल्या.
कधी आम्ही फिरायला जातो. मुकेश मला लाँग ड्राईव्हसाठी घेऊन जातात.
मुकेश आणि मी तेच करतो जे आम्ही युवावस्थेत करत होतो, असंही नीता अंबानी म्हणतात.
मला रस्त्यावर भेळ खाणं आवडतं तर मुकेशला डोसा आणि इडली खाणं आवडतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.