1-2 नाही तर 4 माजी मुख्यमंत्र्यांना लागली लॉटरी; थेट मोदींच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी

मंत्रीमंडळातील नवे चेहरे

नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळातील नवे चेहरे कोण असतील यासंदर्भात शपथविधीचा दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतशी हळूहळू स्पष्टता आली.

40 हून अधिक खासदार सहभागी

नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांबरोबर दिल्लीत स्नेहभोजनापूर्वी चर्चा केली. या चर्चेमध्ये 40 हून अधिक खासदार सहभागी झाले होते. या बैठकीला मोदींनी संबोधित केलं.

चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश

मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये यंदा एक दोन नाही तर तब्बल चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे. हे मुख्यमंत्री कोण ते पाहूयात...

शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशमधून भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या असून राज्याची धुरा संभाळणाऱ्या आणि आता खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवराज यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे.

मनोहर लाल खट्टर

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे सुद्धा मोदींच्या 3.0 कॅबिनेटमध्ये असणार आहे.

जीतन मांझी

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या जीतन मांझी यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार आहे.

एच.डी. कुमार स्वामी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेले एच.डी. कुमार स्वामीही मोदींच्या मंत्रीमंडळात असतील.

VIEW ALL

Read Next Story