कर ही एक अशी व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून सरकार पैसा उभा करते.
अनेक वेळा तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की देशात सर्वाधिक कर कोण भरतं?
भारतातील सर्वात श्रीमंत यादीतील मुकेश अंबानी, रतन टाटा की गौतम अदानी यापैकी सर्वाधिक टॅक्स कोण भरते हे जाणून घेणार आहोत.
भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी ICICI बँकेने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 11793 कोटी कर भरलाय.
टाटा समूहाची आयटी कंपनी TCS ने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 14,604 कोटी रुपयांचा कर दिलाय.
HDFC बँकेने एकूण 15,350 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे.
SBI ने एकूण 17,649 कोटी रुपये जमा केलाय.
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे सर्वाधिक कर भरतात. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने 20,713 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर भरला आहे.