घाघरा-चोली परिधान करणाऱ्या मुघल बादशहाची कहाणी

Pravin Dabholkar
Feb 24,2024


भारतावर अनेक वर्षे मुघलांनी राज्य केले. अनेक मुघल बादशहांच्या कहाण्या आजही सांगितल्या जातात.


मुघल बादशहा मोहम्मद शाह रंगीलाची कहाणी अनोखी आहे. तो 1719 ते 1748 दरम्यान शासक होता.


त्याने आपल्या शासनकाळात विचित्र गोष्टी केल्या, ज्याची राज्यात चर्चा व्हायची.


1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीवर बादशहा नव्हता. 1719 पर्यंत दिल्लीवर अनेक बादशहांनी राज्य केले. पण कोणी टिकले नाही.


17 सप्टेंबर 1719 ला रौशन अख्तर उर्फ मोहम्मद शहा, ज्याला मोहम्मद शहा रंगीला नावाने ओळखले जायचे, तो गादीवर बसला.


त्यावेळी त्याचे वय अवघे 16 वर्षे इतके होते. बादशहा बनल्यानंतर त्याने इस्लामिक कायद्यातून अनेक निर्बंध हटवले.


त्याच्या काळात दिल्लीत पुन्हा संगीत आणि कलेला प्रोत्साहन मिळाले.


त्याला महिलांचे कपडे परिधान करण्याची आवड होती.


मोहम्मद शहा रंगीला अनेकदा दरबारात घागरा चोली परिधान करुन यायचा.


वेबस्टोरीत वापरण्यात आलेले फोटो काल्पनिक आहेत.

VIEW ALL

Read Next Story