महाराष्ट्रातील पंचगणी येथे असलेली ही शैक्षणिक संस्था येथील अभ्यासक्रम, शिस्तीबरोबरच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. 1945 साली या शाळेची स्थापना झाली आहे.
उत्तराखंडमधील मसुरी सारख्या सुंदर शहरात असलेली ही शैक्षणिक संस्था दिसायला फारच सुंदर आहे. या शाळेचे फोटो नुसते गुगल केले तरी तुम्हाला त्याच्या सौंदर्याचा अंदाज येईल.
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे असलेलं सिंधिया गर्ल्स स्कूल फारच सुंदर आहे. या संस्थेच्या इमारतीवर केलेलं नक्षीकाम पाहून तुम्हाला नक्कीच एखाद्या राजवाड्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
हिमाचलमधील कसौलीमधील सनवार येथील लॉरेन्स स्कूल हे जगातील प्रसिद्ध शाळांपैकी एक आहे.
अजमेर शहरातील मेयो कॉलेज हे एखाद्या राजवाड्याप्रमाणे दिसते. ऐतिहासिक संदर्भ असलेलं हे कॉलेज देशातील सर्वात सुंदर शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.
तामिळनाडूमधील मोंटफोर्ट स्कूल हे भारतामधील एक प्रसिद्ध बोर्डींग स्कूल आहे. या संस्थेला भारतामधील बेस्ट बोर्डींग स्कूल हा सन्मान मिळाला आहे.
नैनितालमधील शेरवुड कॉलेज हे देशातील सर्वात सुंदर कॉलेजपैकी एक आहे. या कॉलेजची स्थापना 1869 साली झाली आहे.
दून स्कूल हे देहरादूनमधील प्रसिद्ध कॉलेज आहे. 1935 साली स्थापन करण्यात आलेलं हे कॉलेज 72 एकरांवर पसरलेलं आहे. हे केवळ बॉइज स्कूल आहे.
शिमल्यामधील बिशप कॉटन स्कूल हे एखाद्या पर्यटनस्थळाप्रमाणे वाटते. देशातील सर्वात सुंदर शहरांपैकी एका शहरात असणारं हे कॉलेज दिसायला फारच सुंदर आहे.