जेवणात ठसका आणण्यासाठी आणि ते चमचमीत करण्यासाठी अनेकदा मिरचीचा वापर होतो. मिरचीमध्ये अनेक प्रकारच्या अँटीऑक्सिडेंट्ससोबत व्हिटामिन सी चं प्रमाण अधिक असतं. पण, हीच मिरची चिरल्यावर हातांची आग होते.
काही मिरच्या इतक्या तिखट असतात, की त्या चिरताच हातांची आग होऊन विचित्र प्रकारे झोंबण्यास सुरुवात होते. मिरच्यांमध्ये असणाऱ्या कॅप्साईन नावाच्या एका रसायनामुळं ही क्रिया होते. काही मिरच्यांमध्ये हा घटक अधिक असतो तर, काही मिरच्यांमध्ये कमी.
मिरची चिरताना हा घटक, हे रसायन त्वचेच्या संपर्कात येतं आणि त्वचेची आग होण्यास सुरुवात होते. पण ही गंभीर समस्या नसून, काही वेळानं त्वचेची जळजळ शांत होते.
मिरची चिरल्यानंतर हातांची आग होत असल्यास हातांवर थंड दूध, दही किंवा तूप लावल्यास आराम मिळतो. हातांवर दही लावलं तरीही अशा वेळी आराम मिळतो.
मिरचीनं होणारी आग दूर करण्यासाठी कोरफडीच्या गराचा वापरही केला जातो. यामुळं बराच आराम मिळतो
हातांची जळजळ आणि एखादी जखम बरी करणारा आणखी एक पदार्थ म्हणजे मध. मिरचीपासून होणारी आग थांबवण्यासाठी हातांवर मध लावल्यासही आराम मिळतो.