मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून मिताली मयेकरला ओळखले जाते.

‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ अशा अनेक मालिकांमधून ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली.

मिताली ही आपल्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता मितालीने इन्स्टाग्रामवर समर स्पेशल फोटो शेअर केले आहेत.

यात मितालीने गुलाबी रंगाचा जंपसूट परिधान केला आहे.

यात तिने केस कर्ल्स केले असून पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. तिच्या हातात ज्यूस पाहायला मिळत आहे.

मितालीने शेअर केलेल्या या फोटोत तिच्यासोबत एक मांजरही पाहायला मिळत आहे.

तिने या फोटोंना कॅप्शन देताना 'क्लासिक समर आफ्टरनून' असे म्हटले आहे.

VIEW ALL

Read Next Story